जागे व्हा जागे व्हा ! दिलीप कांबळे जागे व्हा ; ‘मंत्र्यांच्या कार्यलयासमोर मराठा आंदोलकांची घोषणाबाजी’

पुणे : राज्यभरात मराठा आरक्षण प्रश्न चांगलाच पेटला आहे. परलीमध्ये सुरू झालेल्या ठिय्या आंदोलनाने आता राज्यभर आक्रमक रूप धारण केल आहे. अनेक ठिकाणी हिंसेचा आगडोंब उडाला असताना आता या आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणजे लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांच्या घर, कार्यालयासमोर मराठा आंदोलन ठिय्या देऊन घोषणाबाजी करत आहेत. आज सकाळपासूनच पुण्यात या आंदोलनाला सुरवात झाली आहे.

सकाळी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन केल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आपला मोर्चा राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या कार्यालयाकडे वळला आहे. यावेळी जागे व्हा जागे व्हा ! दिलीप कांबळे जागे व्हा या घोषणा देत हे आंदोलन केले.

दरम्यान, उद्या सकाळी 10 वाजता आमदार मेधा कुलकर्णी तर 11 वाजता केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या घरासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे.

राज्यभरात सुरु असलेलं मराठा क्रांती मोर्चाचे हे आंदोलन काही ठिकाणी शांततेत सुरु आहे, तर काही ठिकाणी याला हिंसक वळण लागलं आहे. मराठा आरक्षणासाठी बीड जिल्ह्यातील परळीतही १८ जुलैपासून मराठा मोर्चाच्या वतीने ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आलं, जे अद्याप सुरुच आहे.

गिरीश बापटांचा कार्यालयासमोर मराठ्यांचा एल्गार !

मराठा आरक्षण : आत्महत्यासत्र थांबेना औरंगाबादमध्ये तरुणाची आत्महत्या

मराठा क्रांती मोर्चा : मुंबई बंद स्थगित