विखे पाटलांच्या प्रयत्नांना यश, निळवंडे कालव्यांची काम सुरू करण्याचा सरकारचा निर्णय !

टीम महाराष्ट्र देशा : जिरायती भागाला वरदान ठारणाऱ्या निळवंडे धरणाच्या कालव्यांची काम तातडीने सुरू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठीत घेण्यात आला. प्रकल्प अहवालात असलेल्या अटी आणि शर्थीमध्ये कोणताही बदल न करता ही काम पूर्ण करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

निळवंडे कालव्याच्या संदर्भात निर्माण झालेल्या प्रश्नात मार्ग काढण्यासाठी माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने मंत्रालयात मुख्यमंत्री ना.देवेद्र फडणवीस यांच्या उपस्थित बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीस जलसंपदा मंत्री ना.गिरीष महाजन, ना.विजय शिवतारे माजी मंत्री मधुकर पिचड, राधाकृष्ण विखे पाटील, खा.डाॅ.सुजय विखे पाटील, खा.सदाशिव लोखंडे, आ.शिवाजी कर्डीले, आ.वैभव पिचड, जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी जिल्हा पोलीस अधिक्षक संधू यांच्यासह जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि अकोले तालुक्यासह लाभक्षेत्रातील शेतकरी आणि सर्वपक्षांचे प्रतिनिधी याप्रसंगी उपस्थित होते.

Loading...

या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी अकोले तालुक्यातील निर्माण झालेल्या कालव्याच्या कामातील समस्या जाणून घेतल्या.अकोले तालुक्यातील कालव्यांची काम ही बंदीस्त न करता ठरलेल्या पध्दतीनेच करण्याबाबत एकमत झाले.तालुक्यातील डाव्या आणि उजव्या उच्चस्तरीय कालव्यांची काम एकाचवेळी सुरू करून वर्षभरात पूर्ण करण्यासाठी प्राधान्या दिले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

कालव्यांच्या कामाबाबत न्यायप्रविष्ट असलेल्या सर्वच विषयांबाबत न्यायालयाने निर्णय दिल्यानंतरच कार्यवाही करण्याचे ठरविण्यात आले.प्रकल्प अहवालातील शर्थी आणि अटीमध्ये कोणताही बदल न करता भंडारदारा आणि निळवंडे या दोन्ही लाभक्षेत्रात ओलीताखाली येणारे क्षेत्र अबाधित राहातील यावरही बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले.

वर्षानुवर्षे दुष्काळी परिस्थितीला सामोरे जाणार्या जिरायती भागातील शेतकर्यासाठी लोकनेते आदरणीय खासदार साहेबांनी पाहीलेले स्वप्न आजच्या निर्णयाने पूर्ण होत असल्याचे समाधान असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करून माजी मंत्री राधाकृष्ण विखे म्हणाले की,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,जलसंपदा ना.गिरीष महाजन यांनी वेळोवेळी सभागृहात आणि निवडणुकीच्या निमिताने दिलेला शब्द पाळला,अकोले तालुक्यातील जनतेनेही या निर्णयाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल विखे पाटील यांनी आभार व्यक्त केले आहेत. या कालव्यांसाठी संघर्ष करणाऱ्या  लाभार्थी क्षेत्रातील शेतकर्याचे हे यश असल्याचे त्यांनी सांगितले.

खा.डाॅ सुजय विखे पाटील यांनी या निर्णयाचे स्वागत करून लोकसभा निवडणुकीच्या निमिताने कालव्यांची काम सुरू करण्याच आपण दिलेले आश्वासन पूर्णत्वास जात आहे. जिरायती भागातील शेतकर्यासाठी पाण्याची लढाई शेवटपर्यत करतानाच पश्चिम वाहीनी नद्याचे पाणी पुर्वेकडे वळविण्याच्या निर्णयाचा पाठपुरावा करतानाच कुकडीच्या पाण्याचा लढाईही आता यशस्वी करायचा असल्याचे खा.डाॅ.सुजय विखे पाटील म्हणाले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
म्हणून नारायण राणे यांचा जळफळाट होतोय, शिवसेनेचा ढाण्या वाघ राणेंवर गरजला
टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
इंदोरीकर महाराजांच्या 'त्या' वक्तव्यावर सिंधुताई सपकाळांची लक्ष्यवेधी प्रतिक्रिया
फक्त विधानसभा कशाला लोकसभेच्या देखील निवडणुका घ्या, पवारांनी फडणवीसांना ललकारलं
अर्जुन कपूरचा मलायका सोबतच्या नात्याबद्दल बोलतांना मोठा खुलासा ...
शरद पवार होणार निवृत्त ? पुन्हा राज्यसभेबाबत सस्पेन्स कायम
चुकीला माफी नाही ! आदित्य ठाकरे यांनी केले दिल्लीतील 'त्या' अधिकाऱ्याला निलंबित
शिवसेनेचा 'ढाण्यावाघ' ऊझबेकिस्थानात