अर्थसंकल्पात घेण्यात येणार ‘राष्ट्रीय बँक’ स्थापनेचा निर्णय !

नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारीपासून सुरू होणार आहे. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करतील तर 1 फेब्रुवारीला बजेट सादर केले जाणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 29 जानेवारीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करतील. अधिवेशनाच्या दुसर्या भागात अर्थसंकल्पाच्या प्रस्तावांवर चर्चा होईल. यापूर्वी सरकारने कोरोनामुळे संसदेचे हिवाळी अधिवेशन बोलावले नव्हते. CCPA ने म्हटले की, अधिवेशन काळात कोरोना विषाणूशी संबंधित सर्व प्रोटोकॉलचे पालन केले जाईल.

यावेळी कोरोना काळात अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्यांबरोबरच उद्योजकांना देखील दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. तर गेल्या वर्षभरात अर्थव्यवस्थेची होत असलेली पडझड लक्षात घेता यंदाचा अर्थसंकल्प यावर काय उपाययोजना आणणारा ठरतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर अर्थसंकल्पाच्या मांडणीला आता जेमतेम एक आठवडा उरला असताना. 2021-22 चा केंद्रीय अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून नव्या राष्ट्रीय बँकेच्या स्थापनेचा निर्णय होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. या बँकेद्वारे देशातील पायाभूत सुविधा उभारणी क्षेत्राला कमी व्याजाचे कर्ज मिळून हे क्षेत्र पुन्हा प्रगतीच्या वाटेवर वेगाने आगेपूच करू शकणार आहे.

नव्या राष्ट्रीय बँकेसाठी सुरुवातीला 1 लाख कोटी आणि 20 हजार कोटी रुपये असा निधी देण्याचा संकल्प केंद्र सरकारने केला आहे. त्यासाठी नवा कायदा आणून भविष्य निर्वाह निधी (पीएफ), पेन्शन आणि विमा क्षेत्रातील निधीपैकी काही हिस्सा या बँकेच्या भाग भांडवलात गुंतवावा लागणार आहे.

नव्या बँकेसाठी केंद्र नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अॅण्ड डेव्हलपमेंट विधेयक मंजुरीला आणणार आहे. देशातील पायाभूत सुविधा उभारणी आणि बांधकाम उद्योगांना राष्ट्रीय बँक दीर्घ मुदतीचे अर्थसहाय्य देणार आहे. कोरोनाच्या संकटाने ग्रासलेले हे उद्योग या अर्थसहाय्याच्या टॉनिकमुळे पुन्हा यशस्वी झेप घेऊ शकणार आहेत.

महत्वाच्या बातम्या