कांद्याला प्रति क्विंटन २०० रुपये अनुदान देण्याचा निर्णय

Onion Farming in India maharashtra

टीम महाराष्ट्र देशा : गेले काही दिवस अल्प उत्पन्न मिळवून देणारा शेतकऱ्याच्या कांद्याला प्रति क्विंटन २०० रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना गेले काही दिवस किलोमागे १ ते २ रुपयांचा भाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्याचा वाढता रोष लक्षात घेता सरकारनं प्रति क्विंटल २०० रुपयांचं अनुदान जाहीर केलं आहे. १५ डिसेंबरपर्यंत कांदा बाजारात आणणाऱ्या शेतकऱ्यांना ही अनुदानाची रक्कम मिळेल.

याशिवाय परराज्यातील कांद्यांच्या वाहतुकीला प्रोत्साहन देण्याचाही सरकारचा विचार आहे. कांद्यावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना सरकारकडून प्रोत्साहन दिलं जाणार आहे. कांदा उत्पादकांची नाराजी दूर करण्यासाठी आज मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.