Share

Sanjay Raut | …तर बेळगाव आणि बंगळुरूमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याचा निर्णय व्हावा – संजय राऊत

Sanjay Raut |  नाशिक : हा देश हे फेडरल स्टेट आहे. अनेक राज्यांचे बनून देश बनला हे काही संस्थान नाही. सगळ्या राज्यांचे एकमेकांशी प्रेमाचे संबंध आहेत. मुख्यमंत्री नवस फेडायला गुवाहाटीला गेले आल्यावर त्यांनी आसाम भवन उभारण्याची घोषणा केली. याचा आनंद आहे. राष्ट्रीय एकात्मका घट्ट होते. मात्र मुख्यमंत्री बोम्मई कोल्हापूर, सोलापूरला कर्नाटक भवन उभारण्याचे म्हणत असतील. तर बेळगाव आणि बंगळूरूला महाराष्ट्र भवन उभारण्याचा निर्णय व्हावा, मग आम्ही तुमचा विचार करू, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

“मुंबईत देखील कानडी बांधवांचे भवन उभारले आहेत. अनेक हॉल आहेत. आमचा त्यांच्याशी वाद नाही. पण एका इर्षेने तुम्ही हे करणार असाल, तर आम्हाला देखील बेळगाव मध्ये महाराष्ट्र सदन उभारायला जागा द्या”, असे राऊत म्हणाले.

शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी काल संजय राऊतांना शिवी दिली होती. त्यावर राऊत म्हणाले, “मला जर कोणी गद्दार म्हटल्यावर शिव्या देत असेल तर तो मी माझा सन्मान समजतो. त्यांना उत्तम शिव्या येत असतील तर आधी शिवरायांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांना, भाजप मंत्री आणि प्रवक्त्याना द्याव्यात देऊन दाखवाव्यात.आम्ही त्यांच्यावर फुल उधळू, महाराष्ट्र त्यांचे कौतुक करेल.”

“महाराष्ट्रात ढोंग्यांची लाट आली आहे. कुठलं यांचं शिवप्रेम मोदींना रावण म्हटल्यावर तुमची अस्मिता जागी होते. पण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलल्यावर अस्मिता जागी होत नाही,” असे संजय राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या : 

Sanjay Raut |  नाशिक : हा देश हे फेडरल स्टेट आहे. अनेक राज्यांचे बनून देश बनला हे काही संस्थान नाही. सगळ्या …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Nashik Politics

Join WhatsApp

Join Now