fbpx

बाबरी मशीद विध्वंस प्रकरणाचा नऊ महिन्यात निर्णय द्या, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

टीम महाराष्ट्र देशा- १९९२ च्या बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी विशेष न्यायालयानं पुढच्या नऊ महिन्यात निर्णय द्यावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरलीमनोहर जोशी, आणि उमा भारती यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते या प्रकरणात आरोपी आहेत. या प्रकरणी साक्षी पुरावे नोंदवण्याची प्रक्रिया पुढच्या सहा महिन्यात पूर्ण करावी, असंही न्यायालयानं सांगितलं आहे.

या प्रकरणाची सुनावणी होत असलेले विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती येत्या ३० सप्टेंबरला निवृत्त होत आहेत, त्यांना सुनावणी पूर्ण होईपर्यंत मुदतवाढ देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले. याबाबत उत्तर प्रदेश सरकारनं निर्णय जारी करावा, असंही न्यायालयानं म्हटलं आहे.