एकाच दिवशी दोन परिक्षेचा निर्णय रद्द करावा: विनोद पाटील

vinod patil

औरंगाबाद : येत्या २८ फेब्रुवारी रोजी आरोग्य विभागाची परिक्षा होणार आहे. मात्र एकाच दिवशी दोन परिक्षा होत असल्याने उमेदवारांची गैरसोय होउ शकते. दोन परिक्षा एकाच दिवशी देणे विद्यार्थ्यांना शक्य होणार नाही. यामुळे एका दिवशी एकच परिक्षा घ्यावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चा समन्वयक तथा याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केली आहे.

२०१९ मध्ये राज्य सरकारच्या वतीने आरोग्य विभागातील विविध पदांच्या भरतीसाठी जाहिरात काढण्यात आली होती. त्यात विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज केला, परंतु मराठा आरक्षणाला स्थगिती आल्यानंतर राज्य सरकारने अशा विद्यार्थ्यांना कॅटेगरी बदलावी लागल्यामुळे काही विद्यार्थी ईडब्ल्यूएसमध्ये सहभागी झालेत. मात्र, राज्य सरकारने अशा विद्यार्थ्यांना दोनच पदांसाठीच्या परीक्षेसाठी हॉलतिकीट वितरित केले. एखादा विद्यार्थी एखाद्या पदासाठी सकाळी एका शहरात परीक्षा देत असेल तर त्याच विद्यार्थ्याला दुपारी दुसऱ्या शहरात दुसऱ्या पदाची परीक्षा द्यावी लागेल. उमेदवारांसाठी शासनाने तशी कुठलीही व्यवस्था उपलब्ध करून दिलेली नाही, त्यामुळे हे अशक्य आहे.

या विद्यार्थ्यांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जाण्यासाठी एका तासामध्ये कुठली यंत्रणा राज्य सरकार उपलब्ध करून देईल का? असा प्रश्न विनोद पाटील यांनी केला. मराठा आरक्षणाच्या सुणावनीमुळे विद्यार्थी अगोदरच खचलेले आहेत. अशा गोष्टींमुळे ते अजून अडचणीत येतील. सरकारने विद्यार्थ्यांनी निवडलेल्या प्राधान्याच्या जिल्ह्यामध्येच त्यांना परीक्षा सेंटर देण्यात यावे. यासाठी राज्य सरकारने तत्काळ निर्णय बदलावा, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या