Share

Shinde-Fadanvis | राऊत जखमी ; शिंदे-फडणवीसांचा ‘तो’ निर्णय आणणार का त्यांनाच अडचणीत?

Shinde-Fadanvis | मुंबई : काही दिवसांपुर्वीच शिंदे-फडणवीस (Shinde-Fadanvis) सरकारने महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांच्या सुरक्षे बाबत मोठा निर्णय घेतला होता. यामध्ये त्यांनी अनेक बड्या नेत्यांची सुरक्षा माघार घेतली. अशातच भारत जोडो यात्रेमध्ये काँग्रेस (Congress) पक्षाचे विदर्भातील ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी उर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) हे मंगळवारी तेलंगणात ‘भारत जोडो यात्रे’दरम्यान झालेल्या धक्काबुक्कीत जखमी झाले.

नितीन राऊत यांच्या चेहऱ्याला जबर मार लागला आहे. सध्या हैदराबादमधील एका रुग्णालयात नितीन राऊत (Nitin Raut) यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यामुळे आता, काही जणांकडून या दुर्घटनेचे खापर शिंदे-फडणवीस सरकारवर फोडले जात आहे.

संजय राऊत (Sanjay Raut), भास्कर जाधव, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात यांच्यासह महाविकास आघाडीतील १७ नेत्यांची सुरक्षा शिंदे-फडणवीस सरकारने काढून घेतली होती. यामध्ये नितीन राऊत यांचाही समावेश होता.

नितीन राऊत हैदराबादमध्ये राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. नितीन राऊत हे यात्रेत राहुल गांधी यांच्यासोबत चालत होते. राहुल गांधी यांना पाहण्यासाठी रस्त्यावर लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. या गर्दीवर नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांना बरेच कष्ट करावे लागत होते. डॉ. नितीन राऊत यांची सुरक्षा महाराष्ट्र सरकारने काढून घेतल्याने तेलंगणात त्यांना सुरक्षा नव्हती. त्यामुळे नितीन राऊत हे व्हीआयपी नसल्याचे स्थानिक पोलिसांच्या लक्षात आले नाही. गर्दी आणि धक्काबुक्कीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. पोलिसांनी सामान्य माणूस समजून दिलेल्या धक्क्याने डॉ. नितीन राऊत खाली पडले आणि जखमी झाले.

महत्वाच्या बातम्या :

Shinde-Fadanvis | मुंबई : काही दिवसांपुर्वीच शिंदे-फडणवीस (Shinde-Fadanvis) सरकारने महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांच्या सुरक्षे बाबत मोठा निर्णय घेतला होता. यामध्ये …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics