स्पोट होण्याआधी राम मंदिराचा निर्णय घ्या : शिवसेना

RamMandir

टीम महाराष्ट्र देशा : अयोध्याप्रकरणी सुप्रीम कोर्टात आज महत्त्वपूर्ण सुनावणी होणार होती. मात्र आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.त्याच मुद्द्यावरून शिवसेनेने मोदी आणि शहाना व्यंगचित्रातून इशारा दिला आहे.या व्यंगचित्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना बॉम्बवर बसवले आहे. या बॉम्बला राम मंदिराचे नाव दिले आहे.तर या बॉम्बची वात एक व्यक्ती पेटवत असल्याचं दिसत असून ही व्यक्ती म्हणजे राम मंदिराची वाट पाहणारा हिंदू समाज असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

या प्रकरणी नव्या पीठाचे गठन होणार असल्याने १० जानेवारी रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.या मुद्द्यावरून शिवसेनेने अनेकदा भाजप सरकारला धारेवर धरले आहे व अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेनेच्या अधिकृत पेजवर हे व्यंगचित्र टाकण्यात आले आहे.मोदी-शहांंनी स्पोट होण्याआधी निर्णय घ्यायला हवा असा इशारा देणारा आशयही या व्यंगचित्रात टाकण्यात आला आहे.

2 Comments

Click here to post a commentLoading…
Loading...