आरक्षणा बाबत धनगर समाजाला फसवण्याचा उद्योग – प्रकाश शेंडगे

टीम महाराष्ट्र देशा : धनगर आरक्षणाचा निखारा धगधगत असतानाच धनगर समाजाचे नेते व राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी , मुख्यमंत्री धनगर आरक्षणा बाबत फसवत असल्याची टीका केली तर धनगर समाजाला वेळीच आरक्षण मिळाले नाहीतर येत्या निवडणुकांमध्ये सरकारचे पानिपत करू असा इशारा देखील दिला.

केवळ तोंडी आश्वासन नाही तर लेखी स्वरुपातील आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. मात्र तेच मुख्यमंत्री आता धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत केंद्रीय आयोगाकडे शिफारस करण्यात येईल, असं आश्वासन देत आहेत त्यामुळे धनगर समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता शिफारशीची भाषा करत आहेत त्यामुळे हे सरकार धनगर समाजाला फसवण्याचा उद्योग करत असल्याची जहाल टीका प्रकाश शेंडगे यांनी केली.

धनगर समाजाला आता आरक्षण द्यावे अन्यथा या सरकारचे निवडणुकीत पानिपत करु, असा सूचक इशारा शेंडगे यांनी राज्य सरकारला दिला. धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत केंद्रीय आयोगाकडे शिफारस करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं .रविवारी सांगलीच्या नागज येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावरुन प्रकाश शेंडगे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.

You might also like
Comments
Loading...