डेक्कन क्वीनची केटरिंग सेवा आयआरसीटीसीकडे..!

पुणे : डेक्कन क्वीन एक्स्प्रेसची केटरिंग सर्व्हिस इंडियन रेल्वे केटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशनकडे (आयआरसीटीसी) जाणार असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून डेक्कन क्वीनच्या पॅन्ट्री कारमधील खाद्यपदार्थांची संपूर्ण जबाबदारी आणि केटरिंग सर्व्हिसचे व्यवस्थापन रेल्वे बोर्ड करते.

डेक्कन क्वीनसह हावडा-यशवंतपूर एक्स्प्रेस, निजामुद्दीन गरीब रथ, चेन्नई एक्स्प्रेस, अवध एक्स्प्रेस या रेल्वेंच्या केटरिंग सर्व्हिस चालविण्याविषयीची मर्यादित निविदा काढण्यात आली असून व्हरायटी पॅन्ट्री सर्व्हिसेस या कंपनीला १६ लाख ५१ हजार रुपयांचे कंत्राट मिळाल्याची माहिती देण्यात आली. हे कंत्राट सहा महिन्यांच्या प्रायोगिक तत्त्वावर असेल, असेही सूत्रांनी सांगितले.

You might also like
Comments
Loading...