BJP- कर्जमाफीचे राजकारण करू नये – किरीट सोमय्या

शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याच्या दृष्टीने सरकार अभ्यास करत आहे. कर्जमाफी हा सुद्धा त्या अभ्यासाचा एक भाग होऊ शकतो. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तातडीने पाऊले उचलने गरजेचे आहे, त्यामुळे काहीतरी ठोस निर्णय घेण्यात येईल.

नोटबंदीच्या काळात काळ्याचे पांढरे पैसे करणाऱ्या तब्बल 80 हजाराहून अधिक कंपन्यांविरोधात मोदी सरकारने पाऊले उचलली असून त्यांच्यावर लवकरच कारवाई करण्यात येणार आहे. केजरीवालाचा आप तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेल्याचे सांगत दिल्लीत होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाचा विजय होईल असे त्यांनी सांगितले.

यावेळी खासदार अनिल शिरोळे आणि शहरअध्यक्ष योगेश गोगावले उपस्थित होते.