कर्नाटकात आता उपमुख्यमंत्री पदावरून वादाची शक्यता

टीम महाराष्ट्र देशा: बहुमत सादर करण्यास असमर्थ ठरलेले भाजप नेते येडियुरप्पा यांनी अवघ्या अडीच दिवसात मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला, त्यानंतर आता जेडीएस आणि कॉंग्रेस आघाडीचे सरकार कर्नाटकमध्ये येणार आहे, मुख्यमंत्री पदी जेडीएसचे कुमारस्वामी हे असणार आहेत, मात्र, उपमुख्यमंत्री कोणाला करायचे यावरून आता वाद रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

bagdure

वोक्कलिंगा समाजातून येणारे कुमारस्वामी मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत, त्यामुळे राज्यात बहुसंख्येने असणाऱ्या लिंगायत समाजाच्या आमदाराला उपमुख्यमंत्री करण्याची मागणी जोर पकडत आहे. कॉंग्रेसने दलित नेते जी. परमेश्वर , तर जेडीएसने एका मुस्लिम आमदाराला उपमुख्यमंत्री बनवण्याची मागणी लावून धरली आहे.

दुसरीकडे राज्यातील लिंगायत नेते तिप्पाना यांनी खुले पत्र लिहित. भाजपची ऑफर असतानाही लिंगायत आमदार शमनूर शिवशंकरप्पा यांनी कॉंग्रेसची साथ सोडली नाही, त्यामुळे त्यांना उपमुख्यमंत्री बनवण्याची मागणी केली आहे.

You might also like
Comments
Loading...