नाशिक : नाशिक (Nashik Accident) येथे अतिशय थरारक अशी घटना घडली आहे. प्रायव्हेट बसमधून प्रवास करणारे प्रवासी गाढ झोपेत असतानाच पहाटे काळाचा घाला आला. नाशिक येथील मिरची चौक येथे एका प्रायव्हेट लक्झरी बसचा टँकर सोबत भीषण अपघात झाला. अपघातानंतर काही क्षणातच या बसने पेट घेतला आणि क्षणात या बसची राख झाली. या घटनेनं संपुर्ण शहर हादरलं आहे. या अपघातातील मृत्यूची संख्या वाढल्याची माहिती समोर आली आहे.
नाशिक अपघातातील मृत्यूच्या संख्येत वाढ –
नाशिक येथील मिरची चौकात ही धक्कादायक घटना घडली आहे. चिंतामणी ट्रॅव्हल्सची प्रायव्हेट लक्झरी बस मिरची चौकात असताना टँकरसोबत धडकली. यानंतर बस 50 ते 60 फूट पुढे घसरत गेली तर टँकर 70 ते 80 मीटर पुढे जाऊन थांबला. या अपघातानंतर बसने पेट घेतला. यामध्ये १० प्रवाश्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली होती. मात्र, या अपघातात १२ जणांचा मृत्यू धाल्याचं समोर आलं आहे. यावेळी अनेक प्रवाश्यांनी खडकीतून उडी मारुन त्यांचा जीव वाचवला. तब्बल अर्धा तास या गाडीने पेट घेतला.
दरम्यान, ही घटना लोकांच्या निदर्शनास येताच खळबळ उडाली असून पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. या अपघातात जखमी झालेल्या ३४ जणांवर उपचार सुरु आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया –
नाशिक अपघातामध्ये मृत्यू पावलेल्या लोकांच्या नातेवाईकांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. नाशिक येथील बस दुर्घटनेने मन सुन्न केलं आहे. या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं आहे त्यांच्यासोबत माझ्या सद्भावना आहेत. जखमी झालेले लवकरात लवकर बरे होवोत. स्थानिक प्रशासन बाधितांना शक्य ती सर्व मदत करत आहे, अशी प्रतिक्रिया मोदींनी दिली आहे. तसेच नाशिकमध्ये बसला लागलेल्या आगीत मृतांच्या प्रत्येक नातेवाईकाला PMNRF कडून 2 लाखांची मदत दिली जाणार आहे, जखमींना रु. 50,000, अशी घोषणा करण्यात आली आहे.
एकनाथ शिंदे यांची घोषणा –
नाशिक येथे झालेल्या भीषण बस अपघातात ११ नागरिकांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. ही घटना अतिशय दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी असून या घटनेमागील कारणांचा शोध घेतला जाईल. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) ट्विट केलं आहे. तर मुख्यमंत्री कार्यलयाच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक ट्विट करण्यात आलं आहे. यामध्ये या अपघातातील जखमींवर शासकीय खर्चाने तातडीचे वैद्यकीय उपचार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. नाशिक येथे झालेल्या या अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. एवढंच नाही तर या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आली असल्याचं या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Indian Air Force Day | भारतीय वायुसेनेच्या शौर्याचे 90 वर्ष, जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व
- Breaking News |“जयदेव ठाकरे आणि स्मिता ठाकरेंनी बाळासाहेबांना मनस्तापच दिला”; उद्धव ठाकरेंच्या आतेबहिणीचे आरोप
- Mohan Bhagwat | ‘वर्ण आणि जातीव्यवस्थेचा त्याग केला पाहिजे’ म्हणत मोहन भागवत यांनी केलं मोठं वक्तव्य
- Nana Patole | नाशिकचा अपघात खड्ड्यांमुळेच ; नाना पटोले यांचा आरोप
- NANA PATOLE । “तुम्हाला जन्मदात्त्यांबद्दल अभिमान नाही, ही कुठली संस्कृती?”; चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर पटोलेंचा सवाल
‘कोण आफ्रिदी? कोणत्या जोकरचं नाव घेता…’, शाहिद आफ्रिदीचं नाव घेताच असदुद्दीन ओवैसी भडकले