Share

Sharad Pawar | शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी, अज्ञात व्यक्तीने केला फोन

Sharad Pawar | मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना फोनवरून जीवे मारण्याच्या धमकी आली आहे. सिल्व्हर ओक येथील शरद पवार यांच्या घरी अज्ञात व्यक्तीने फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली. मुंबईत येऊन देशी बनावटीच्या पिस्तुलाने पवार यांची हत्या करणार असल्याचे फोन करणाऱ्याने सांगितले.

सिल्वर ओकवरील पोलीस ऑपरेटरने या धमकी संदर्भात पोलिसात तक्रार दिली आहे. आरोपींनी हिंदीत धमकी दिली. या घटनेनंतर जवळच्या गमदेवी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध 294 आणि 506 (2) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फोन करणाऱ्याची ओळख पटली आहे. बिहारमधून हा फोन आला. फोन करणार्‍याने यापूर्वीही पवार यांना फोनवरून धमकी दिली आहे. त्यावेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली आणि समजावून सांगितल्यावर सोडून दिले होते. दरम्यान या व्यक्तीने पुन्हा धमकी दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

महत्वाच्या बातम्या : 

Sharad Pawar | मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना फोनवरून जीवे मारण्याच्या धमकी आली आहे. सिल्व्हर ओक येथील शरद …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now