बाधितांच्या संख्येत घट तरी जालन्यात मृत्यू सत्र सुरुच!

जालना: गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत घट दिसत आहे त्यामुळे जालनेकरांना काहीसा दिलासा मिळत आहे, असे असले तरी देखील कोरोनामुळे होणारा मृत्यू सत्र काही थांबायचे अजून नाव घेत नाहीये. जोपर्यंत मृत्यू दर कमी होत नाही तोपर्यंत चिंतेचे वातावरण असणार आहे. कोरोना सोबतच आता म्युकरमायकोसीस हा आजार देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यामुळे रोगांमध्ये चढाओढ दिसत आहे.

जूनच्या पहिल्या आठवड्यात २८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रुग्णालयात आलेला प्रत्येक रुग्ण बरा होऊनच घरी जावा, यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. तर बाधितांनी लक्षणे दिसू लागताच रुग्णालयात दाखल व्हावे, जेणेकरून तातडीने उपचार करता येतील, तसेच कोरोनाला रोखता येईल असे जाणकार सांगत आहेत.

जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात २९ नव्या बाधितांची नोंद झाली असून चौघांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोनावर मात केलेल्या ६९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, जालना शहर ८, पिंपरखेड १, कुंभेफळ १, मंठा २, ढोकसळ १, जयपूर १, पांढुरणा १, पाटोदा १, घनसावंगी तालुक्यातील घानेगाव १, कुंभारपिंपळगाव १, अंबड शहर २, भलाडी १, गोंदी १, बदनापूर तालुक्यातील चणेगाव १, जाफराबाद तालुक्यातील कचनेरा १, टेंभुर्णी १, भोकरदन तालुक्यातील आन्‍वा २, कोडा १, उंबरखेडा १ अशाप्रकारे आरटीपीसीआरद्वारे २३ तर अँटिजन तपासणीद्वारे ६ असे एकूण २९ अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांनी दिली.

जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात एक हजार ४८४ नमुन्यांची अॅँटिजन तपासणी करण्यात आली. यातील १० अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले, तर एक हजार ४७४ निगेटिव्ह आले. दरम्यान, या तपासणी मोहिमेत जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी अँटिजन तपासणी करून घेण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP