ध्वजारोहणासाठी जाणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा अपघातात जागीच मृत्यू

टीम महाराष्ट्र देशा : लातूरमध्ये प्रजाकसत्ताक दिनानिमित्तच एनसीसी कॅडेट्स असलेल्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.अहमदपूर जवळील काजळी हिप्परगा येथील दोन विद्यार्थी दुचाकीवर ध्वजारोहणासाठी महाविद्यालयाकडे जात असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. गोविंद दहिफळे आणि पूजा भोसले अशी मृतांची नावे आहेत. हे दोघेही एकाच गावाचे असल्याने दुचाकीवरून अहमदपूर येथील महात्मा गांधी महाविद्यालयांकडे येत होते.

Loading...

या अपघातात मृत्यूमुखी पडलेली पूजा भोसले  ही कला शाखेच्या द्वितीय वर्षात तर गोविंद हा प्रथम वर्षात शिक्षण घेत होते. या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने प्रजाकसत्ताक दिनाच्या समारोहाला गालबोट लागले आहे. तर दुसरीकडे हे दोघे एकाच गावातील असल्याने गावात देखील शोककळा पसरली आहे.Loading…


Loading…

Loading...