कुस्तीपटू निलेश कंदूरकरचा अखेर मृत्यू, १९ वर्षांच्या मल्लाची जीवाला चटका लावणारी एक्झिट

कराडच्या कृष्णा रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला

टीम महाराष्ट्र देशा- कोल्हापूरचा कुस्तीपटू निलेश विठ्ठल कंदुरकर याचा आज सकाळी उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कुस्तीच्या आखाडय़ात एकचक्री डावातून निसटण्याच्या प्रयत्नात मज्जातंतूला दुखापत झाल्याने १९ वर्षांच्या मल्लाची जीवन-मृत्यूच्या मैदानात थेट मृत्यूशी झुंज सुरू होती. ऐन रंगात आलेल्या कुस्तीच्या आखाडय़ात हा प्रकार घडल्याने उपस्थित कुस्तीशौकिनांच्या काळजाचा ठोका चुकला होता.

रिंगणामध्येच कोसळलेल्या निलेशला कोल्हापूरच्या मेट्रो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पण तिथे त्याच्या प्रकृतीत फारशी सुधारणा होत नसल्याने कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकात पाटील यांनी त्याला मुंबईत हलवण्याचा निर्णय घेतला होता. त्याला मुंबईला आणत असताना प्रकृती अधिकच खराब झाल्याने त्याला कराडच्या कृष्णा रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. अखेर आज पहाटे चारच्या सुमारास निलेशची प्राणज्योत मालवली.

You might also like
Comments
Loading...