कंटेनरच्या धडकेत जखमी झालेल्या ‘त्या’ कामगाराचा मृत्यू

औरंंगाबाद : भरधाव जाणाऱ्या कंटेनरने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वार सुभाष सोमीनाथ आरगडे (रा.मनिषानगर, वाळूज) या कामगाराचा उपचारादरम्यान घाटी रूग्णालयात मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी रात्री सव्वाअकरा वाजेच्या सुमारास एमआयडीसी वाळूज परिसरातील कॉम्पटन ग्रिव्हज कंपनीजवळ घडला.

सुभाष आरगडे हे एमआयडीसी वाळूज परिसरातील एका खासगी कंपनीत नोकरीला होते. मंगळवारी रात्री ११ वाजता कंपनीतील ड्युटी संपल्यावर ते दुचाकी क्रमांक (एमएच-२०-सीए-७०१७) वर आपल्या घराकडे जात होते.

कॉम्पटन ग्रिव्हज कंपनीजवळ आरगडे यांच्या दुचाकीस कंटेनर क्रमांक (एनएल-०१-जी-०६००) ने धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या सुभाष आरगडे यांना उपचारासाठी घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात कंटेनर चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या 

IMP