तौसिफ शेख यांच्या मृत्युमुळे नगर मध्ये तणावाचे वातावरण

अहमदनगर : कर्जत येथील जिल्हाधिकारी कार्यालया समोर दावल मलिक देवस्थानच्या जागेतील अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी पेटवून घेतलेल्या तौसिफ शेख उर्फ सुर्याभाई यांची पुण्याच्या ससून रुग्णालयात मृत्युची झुंज अखेर संपली. या घटनेचे तीव्र पडसाद आज कर्जत मध्ये उमटत आहेत. या घटनेमुळे नागरिकांनी शाळा-महाविद्यालयांसह इतर सर्व व्यवहार बंद ठेऊन निषेध व्यक्त करत आहेत . संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल केल्याशिवाय अंत्यस्कार न करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने तणाव निर्माण झाला आहे.

आंदोलकांचा मुख्य रोष पोलिस आणि प्रशासनाविरुद्ध असून त्यासोबतच पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी त्यांच्या समर्थकांना पाठीशी घालण्यासाठी या प्रकरणात हस्तक्षेप केल्याचाही आरोप केला जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रश्न कर्जतमध्ये गाजत आहे. कोर्टाने अतिक्रमण पाडण्याचा आदेश दिला आहे. मात्र, पोलीस बंदोबस्त अगर अन्य कारणे सांगून कारवाई टाळली जात असल्याने शेख यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पेटवून घेतले. त्यात गंभीर भाजल्यानंतर त्यांना पुण्याला हलविण्यात आले. रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाला.