‘शिवशंकरभाऊ पाटील यांच्या निधनाने एक व्रतस्थ सेवेकरी हरपला’ : नाना पटोले

nana patole

मुंबई : श्री संत गजानन महाराज संस्थान, शेगावचे विश्वस्त शिवशंकर भाऊ पाटील यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. त्यांच्या निधनाने एक व्रतस्थ सेवेकरी हरपला, अशा शोकभावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केल्या आहेत.

कर्मयोगी शिवशंकर भाऊ पाटील यांनी श्री गजानन महाराज संस्थानच्या माध्यमातून अध्यात्मिक व सामाजिक कार्याची सांगड घालून नवा आदर्श घालून दिला. मंदिर व्यवस्थापनाचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे शेगावचे गजानन महाराज मंदिर. गजानन महाराज मंदिराच्या सेवाकार्यात त्यांनी स्वतःला वाहून घेतले होते. भाऊसाहेबांनी संस्थानच्या माध्यमातून विविध प्रकल्प उभे केले. ग्रामीण भागातील मुलांना शिक्षण मिळावे म्हणून शैक्षणिक संस्था उभारल्या. भाऊंची अत्यंत साधी राहणी व उच्च विचारसरणी होती. गजानन महाराजांच्या विचाराचा वारसा त्यांनी आयुष्यभर जोपासला. त्यांनी केलेले कार्य चिरंतर राहिल. शंकरभाऊंच्या निधनाने गजानन महाराजांच्या भक्तांचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे.

शिवशंकरभाऊ पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पाटील कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या