स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी….स्टार क्रिकेटपटूवर कोसळला दुखाचा डोंगर

नवी दिल्ली : अफगाणिस्तानचा स्टार लेगस्पिनर राशिद खान यांच्या आईचे 18 जून रोजी निधन झाले आहे. राशीदची आई बऱ्याच दिवसांपासून आजारी होती. आईच्या निधनाची बातमी स्वतः राशिद खान अनेक ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

फडणवीसांना सतावतेय महाराष्ट्राची चिंता, मुख्यमंत्र्यांना लिहले ‘हे’ तातडीने पत्र

रशिदने ट्विटकरून ही माहिती दिली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील या स्टार लेग स्पिनरची आई गेल्या काही दिवसांपासून आजारी होती. याआधी रशिदने आईची प्रकृती ठिक नसल्याचे सोशल मीडियावर सांगितले होते आणि सर्वांच्या प्रार्थनेची गरज असल्याचे म्हटले होते.

राशिद हा अफगाणिस्तान क्रिकेट संघातील सर्वात मोठा स्टार खेळाडू आहे आणि त्याने आपल्या कामगिरीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएल या दोन्ही क्षेत्रात स्वत: साठी नाव कमावले आहे.

राशिदने ट्विटरवर लिहले की, “आई तु माझं घर होतीस. माझ्या जवळ घर नव्हते तेव्हा तू होती. माझा विश्वास बसत नाही की, तू आता या जगात नाहीच. मी सदैव तुझी आठवण करत राहील तुझ्या आत्म्याला शांती मिळो!”