शून्यातून विश्व निर्माण करणारा नेता हरपला ; वाचा कसा होता राजकीय प्रवास

टीम महाराष्ट्र देशा : काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम यांचे दुःखद निधन झाले आहे. मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्यांनी वयाच्या ७३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार केले जात होते. पतंगराव कदम यांनी राज्य मंत्रिमंडळात अनेक मंत्रिपदाची धुरा सक्षमपणे संभाळलेली होती.

पतंगराव कदम कालवश

– जन्म – 8 जानेवारी 1944

– जन्मगाव – सोनसळ, सांगली

– 1985 – पहिल्यांदा आमदार म्हणून निवड

– नंतर सलग 6 वेळा विधानसभेवर

– माजी महसूल, सहकार, वनमंत्री

– मदत आणि पुनर्वसन मंत्रिपदही हाताळलं

– भारती विद्यापीठाचे संस्थापक

– भारती विद्यापीठाची एकूण 180 महाविद्यालयं

असा होता राजकीय प्रवास

– जून 1991 -मे 1992 – शिक्षण राज्यमंत्री

– मे 1992 – 1995 – शिक्षणमंत्री (स्वतंत्र खाते)

– ऑक्टोबर 1999 ते ऑक्टोबर 2004 – उद्योग, व्यापार, वाणिज्य आणि संसदीय कामकाज खात्यांचे कॅबिनेट मंत्री

– नोव्हेंबर 2004 पासून पुढे – पुनर्वसन आणि मदतकार्ये या खात्यांचे मंत्री

– प्रभारी अध्यक्ष – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी

– डिसेंबर 2008 पासून – कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र शासन – महसूल, – पुनर्वसन आणि मदतकार्ये, भूकंप पुनर्वसन आणि शालेय शिक्षण

– मार्च 2009 पासून – कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र शासन महसूल खाते

– नोव्हेंबर 2009 पासून पुढे – कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र शासन – वनविभाग

– 19 नोव्हेंबर 2010 ते 2014 – कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र राज्य – वनविभाग, पुनर्वसन आणि मदतकार्ये, भूकंप पुनर्वसन