कोरोनामुळे सहायक पोलिस उपनिरीक्षकाचा मृत्यू; जालन्यात ११७ नव्या रुग्णांची भर

जालना : मंठा येथील सहायक पोलिस उपनिरीक्षक प्रवीण देशमुख यांचा कोरोनामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ते ५५ वर्षांचे होते. कोरोनाचे निदान झाल्यानंतर त्यांच्यावर औरंगाबाद येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रवीण देशमुख मंठा येथील पोलिस ठाण्यात सहा महिन्यांपूर्वी सहायक पोलिस उपनिरीक्षक म्हणून रुजू झाले होते. काही दिवसांपूर्वी आजारी असल्यामुळे ते जालना येथील आपल्या घरी उपचारासाठी गेले होते. मात्र, ४ दिवसांनंतर तपासणीअंती त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांना औरंगाबाद येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

जालन्यात आणखी ११७ नवे रुग्ण, १८ जणांना डिस्चार्ज
जालन्यात मंगळवारी आणखी ११७ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली, तर १८ जणांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले. मंगळवारी ढळलेल्या नव्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये जालना जालना शहर ५७, कडवंची ३, काकडा १, देवगाव १, पीरकल्याण १, बुटेगाव १, इंदेवाडी १, मंठा तालुक्यातील मंठा शहर १, परतूर शहर १, अंबड शहर १, बदनापूर तालुक्यातील विलाडी १, जाफराबाद तालुक्यातील जाफराबाद शहर १, घाणखेडा १, सावरखेडा ३, टेंभुर्णी ३, निमखेडा २, भोकरदन तालुक्यातील जयदेववाडी २८ आणि इतर जिल्ह्यातील बुलडाणा ९, बीड १ आरटीपीसीआरद्वारे १०६ व्यक्तींचा, तर अँटिजेन तपासणीद्वारे ११ अशा ११७ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिली.

जालन्यात ३१ मार्चपर्यंत शाळा, महाविद्यालये, आठवडी बाजार बंद
जालन्यात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे इयत्ता दहावी, बारावीचे विद्यार्थी वगळता जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये आणि आठवडी बाजार ३१ मार्चपर्यंत पुर्णपणे बंद ठेवण्यात निर्णय घेण्यात आला आहे. या काळात हॉटेल व्यवसाय ५० टक्के क्षमतेने राहणार खुले राहणार आहेत, तर मंगलकार्यासाठी केवळ ५० व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी आहे. मात्र, सार्वजणिक ठिकाणी असताना फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर बंधनकारक असून कोरोनाचे सर्व नियम पाळावे लागणार आहे. ३१ मार्चपर्यंत हे निर्बंध लागू राहणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या