मराठा आरक्षण आंदोलनात जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू

नवी मुंबई : नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे मराठा क्रांती मोर्चाला हिंसक वळण लागले होते. मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारात जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. रोहन तोडकर या २१ वर्षीय तरुणाचं नाव असून दगडफेकीत रोहन गंभीर जखमी झाला होता. जे जे रुग्णालयातील अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

कळंबोलीत बंदला हिंसक वळण लागले, तर अनेक ठिकाणी दगडफेकही करण्यात आली. यामध्येच रोहन तोडकर जखमी झाला होता. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. खबरदारीचा उपाय म्हणून नवी मुंबईतील अनेक भागांमधील मोबाईल इंटरनेट सेवा गुरुवारीपासून बंद करण्यात आली आहे. सध्या नवी मुंबईत शांतता असली तरी अफवा पसरुन पुन्हा तणाव निर्माण होऊ नये यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मराठा आरक्षण : नदीत उडी घेऊन एकाने दिला जीव

काय आहेत नेमक्या मराठा समाजाच्या प्रलंबित प्रमुख मागण्या

  • मराठा समाजाला त्वरीत आरक्षण द्यावे.
  • मराठा विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कातील ५० टक्के सवलतीची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता रद्द करा.
  • राज्य सरकारच्या नोकर भरतीत मराठयांसाठी घोषित केलेल्या १६ टक्के आरक्षणाचा सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात अध्यादेश काढून त्यांचे त्वरीत कायद्यात रूपांतरण करावे.
  • आण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतंर्गत कर्ज देण्यासाठी बँकांना सक्तीचे आदेश द्यावेत.
  • मौजे कोपर्डी ता. कर्जत घटनेतील अत्याचार व हत्या करणाऱ्या नराधम आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी.
  • अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमाच्या तरतुदींचा सर्रास होणारा गैरवापर थांबवावा व योग्य ती दुरुस्ती करावी.
  • आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे.