fbpx

लिंगायत धर्माच्या पहिल्या महिला जगतगुरु माते महादेवी यांचे निधन

टीम महाराष्ट्र देशा: बसव धर्मपीठाच्या प्रमुख आणि लिंगायत धर्माच्या पहिल्या महिला जगतगुरु माते महादेवी यांचे निधन झाले आहे. वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी बंगळुरूमधील मणीपाल हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. माते महादेवी यांनी लिंगायत धर्म प्रसारासाठी मोठे कार्य उभारले होते.

लिंगायत धर्म संस्थापक महात्मा बसवेश्वर यांच्या विचारांच्या प्रसारासाठी माते महादेवी यांनी आयुष्यभर काम केले. स्वतंत्र लिंगायत धर्म मान्यतेसाठी माते महादेवी यांचा कायम पुढाकार राहिलेला होता. 1970 मध्ये पहिल्या महिला जगतगुरु म्हणून त्यांना उपाधी देण्यात आली होती. स्वामी लिंगन्ना यांनी त्यांना दीक्षा दिलेली होती.

मागील वर्षी कर्नाटकमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत माते महादेवी यांनी स्वतंत्र लिंगायत धर्माची मागणी लावून धरली होती, त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांची कोंडी झाल्याचं पहायला मिळाले. काँग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी लिंगायत धर्माला मान्यता देण्याची घोषणा करत माते महादेवी यांचा पाठिंबा मिळवला होता.

2 Comments

Click here to post a comment