fbpx

निळूभाऊंचा स्मृतिदिन : खलनायक नव्हे तर शोषितांच्या वेदनांना वाचा फोडणारा खरा नायक

टीम महाराष्ट्र देशा- मराठी रंगभूमी,चित्रपट क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंत अभिनेते महानायक निळू फुले यांचा स्मृतीदिन. दुर्गमातल्या दुर्गम खेडय़ापर्यंत आणि तिथल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचलेली जी काही मोजकी नावे असतील, त्यात निळू फुले यांचे नाव अग्रक्रमाने येते. मराठी चित्रपटसृष्टीत अनेक प्रवाह आले. नटांच्या पिढय़ा बदलल्या. पण सगळ्या प्रवाहांमध्ये निळूभाऊंची जागा टिकून राहिली.

जाणून घेऊ निळूभाऊंच्या आयुष्याशी निगडीत काही रंजक गोष्टी

निळू फुले यांचा जन्म पुण्यामध्ये झाला होता.

निळूभाऊंचे खरे नाव निळकंठ कृष्णाजी फुले. पण निळूभाऊ याच नावाने ते सर्वत्र परिचित होते. पुढे चित्रपटसृष्टीतही ते याच नावाने लोकप्रिय झाले.

वडिल भाजी आणि लोखंड विकून मिळणाऱ्या पैशावर आपले कुटुंब चालवत असत.

सामाजिक बांधिलकीमुळे त्यांचा राष्ट्रसेवा दलाशी संबंध आला. सेवादलाचा कार्यकर्ता म्हणून समाजाची सेवा केली.

मेधा पाटकरांच्या आंदोलनापासून क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या कष्टक-यांच्या चळवळीपर्यंत त्यांनी स्वत:ला जोडून घेतले होते.

निवडणुकीच्या काळात डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांच्या प्रचारासाठी जात होते.

अंधश्रद्धा निर्मूलन, हमाल पंचायत, सत्यशोधक चळवळ यात त्यांचा सक्रिय सहभाग होता.

‘तुला पाहते रे’ मालिकेत ईशाच्या आईची भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्रीचे नाव आहे ‘गार्गी फुले-थत्ते’. गार्गी फुले या मराठी चित्रपटसृष्टीचे लाडके आणि दिग्गज अभिनेते निळू फुले यांची कन्या आहेत. निळू फुले यांचे पुणे येथे अन्ननलिकेच्या कर्करोगाने 13 जुलै 2009 रोजी निधन झाले.