‘प्रिय आकाश..’आय लव्ह यू ; परश्या’ला आलं गंमतीशीर लव्हलेटर

akash

मुंबई : नावात काय..? असं नेहमी ऐकतो. मात्र अनेकांची नावं सारखीच असल्याने अनेकदा गोंधळही उडतो आणि त्यातून होते घडते गंमत. सैराटमधील प्रशांत काळे या भूमिकेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील घराघरात पोहचलेला परश्या म्हणजेच अभिनेता आकाश ठोसर. तो नुकताच पुन्हा चर्चेत आला आहे.

अनेकांची नावं सारखीच असल्याने गोंधळही उडतो आता ‘परश्या’ सोबत ही गंमतीशीर घटना घडली आहे. हे लेटर व्हायरल झाल्यानंतर आकाश ठोसरच्या काही चाहत्यांनी या पत्रामधील’आकाश’ हा आपलाच लाडका अभिनेता आकाश आहे असं वाटलं आणि त्यांनी लेटर आकाश ठोसरला पर्सनल मेसेजच्या माध्यमातून पाठवण्यास सुरुवात केली. अखेर अनेकांनी हा असा प्रकार केल्यामुळे आकाश ठोसरने थेट इन्स्टाग्राम स्टोरीवर हे लव्ह लेटर शेअर करत आपलं म्हणणं मांडलं. ‘अरे मित्रांनो तो आकाश मी नाहीय! सगळे मलाच पाठवतायेत,’असंही या स्टोरीमध्ये आकाशने इमोन्जीसहीत म्हटलं आहे.

दरम्यान काही आठवड्यांपासून सोशल नेटवर्किंगवर एक लव्ह लेटर तुफान व्हायरल होतं आहे. हे लव्ह लेटर ज्या व्यक्तीसाठी लिहिण्यात आलंय त्याचं नाव ‘आकाश’ असं आहे. ‘प्रिय आकाश, तू मला प्रपोज केला आणि तुला मी जे काही म्हटले, त्यासाठी सर्वात आधी सॉरी. नंतर मी विचार केला आणि माझं मन सांगत होतं तूच आहेस तो ज्याची मी वाट बघते. जर माझ्या आधी तुला कोण आवडत असेल, तर नाही म्हटलास तरी चालेल. तुझं माझ्यावर खरं प्रेम असेल, तर हो म्हण. माझ हृदय तुला दिलंय, तुझं हृदय मला दे, प्रेम करते तुझ्यावर एवढे तरी समजून घे, तुझी अंकिता,’ असे हस्ताक्षराने लिहिलेला मजकूर या लव्ह लेटरवर आहे. अभिनेता आकाश ठोसर सैराट नंतर ‘फ्रेण्डशिप अनलिमिटेड’, ‘लस्ट स्टोरीज’ आणि इतर काही चित्रपटांमध्येही झळकला आहे. मात्र त्याची परश्या म्हणून मिळालेली ओळख आजही कायम आहे.

महत्वाच्या बातम्या