fbpx

प्रिय पंतप्रधान, स्वित्झर्लंडमधील काळा पैसा परत आणला का ? ; राहुल गांधी

Modi vs rahul gandhi

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष करत ”प्रिय पंतप्रधान, तुमचे भारतात स्वागत आहे. तुम्ही काळ्या पैशासंदर्भात दिलेल्या आश्वासनाची यावेळी मला आठवण करून द्यावीशी वाटते. तुम्ही विमानातून स्वित्झर्लंडमधील काळा पैसा परत आणला असेल तर भारतातील तरुणांना आश्चर्य वाटेल” असे ट्विट केले आहे.

नरेंद्र मोदी यांनी विदेशातून काळा पैसा आणू असे आश्वासन २०१४ लोकसभा निवडणुकीत दिले होते. आता भाजप चे सरकार येवून पाच वर्ष पूर्ण होत आहेत. पंतप्रधानांनी दिलेले आश्वासन पाळले नसल्यामुळे राहुल गांधीनी नरेंद्र मोदींवर निशाना साधला आहे. दावोस येथे झालेल्या ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या ४८व्या वार्षिक सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी दावोसमध्ये होते. यापूर्वीही राहुल यांनी ऑक्सफॅम संस्थेच्या अहवालाचा दाखला देत मोदींवर शेरेबाजी केली होती. संस्थेच्या अहवालात एक टक्का भारतीयांकडे ७३ टक्के संपत्ती जमा झाल्याची माहिती देण्यात आली होती. या अहवालाच्या बातमीसह राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विटरवरून त्यांना लक्ष केले.