पुणे महापालिका करणार मृत प्राण्यांवर होणार विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार ?  

pune mahapalika125

 

पुणे : महापालिकेच्या हद्दीत हजारो पाळीव आणि भटके प्राणी मृत्युमुखी पडतात. पिंपरी चिंचवड महापालिकेने मृत प्राण्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी सोय उपलब्ध करून दिली आहे. पुण्यात मात्र अशी कोणतीही सोय नसल्याने आरोग्याच्या दृष्टीकोनातून नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे आता शहरात मृत पावणाऱ्या प्राण्यांची यापुढे  शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येणार असल्याचा अभिप्राय महापालिका प्रशासनाने स्थायी समितीला  दिला आहे.

प्राण्यांच्या अंत्यसंस्कारासाठी विशेष विद्युतदाहिनी उभी करण्याचा प्रस्ताव मागील सभागृहात शिवसेनेचे नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांनी ठेवला होता. यावर प्रशासनाकडून अभिप्राय मागवण्यात आला होता. या अभिप्रायाचे अतिरिक्त आयुक्त शीतल तेली -उगले यांच्या स्वाक्षरीने उत्तर देण्यात आले आहे. त्यामध्ये मुंढवा केशवनगर सर्व्हे क्रमांक ९ ते १४/२ या ठिकाणी मृत प्राण्यांची विल्हेवाट लावण्यासाठी इन्सिनेरेतर  प्लॅंट उभारण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. हा प्लॅंट लवकरच सुरु करण्यात येणार असून त्यामुळे मृत प्राण्यांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावता येणार असल्याचा उल्लेख यात करण्यात आला आहे.