रिपब्लिक चॅनलच्या TRP स्कॅम चौकशी करणाऱ्या डीसीपींची सूड बुद्धीने ‘वाहतूक खात्यात’ बदली : भाजप

arnab bjp

मुंबई : टीआरपी स्कॅम समोर आला आणि मनोरंजन क्षेत्रासह लोकशाहीचा चौथा स्थंभ समजल्या जाणाऱ्या समाज माध्यमांवर गंभीर प्रश्न निर्माण होऊ लागले. फक्त मराठी, अर्णब गोस्वामींचे रिपब्लिक चॅनलसह अन्य एका वाहिनीवर टीआरपीमध्ये घोटाळा केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.

तर, रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या ‘पूछता है भारत’ या कार्यक्रमात समाजामध्ये तेढ निर्माण केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यांमध्ये अटक का करू नये, असा प्रश्न मुंबई पोलिसांनी अर्णब यांना नोटीसमध्ये विचारला होता.

भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी या प्रकरणाशी निगडित एक खळबळजनक ट्विट करून महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. “सूड बुद्धी… मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यानी TRP स्कॅमचा तपास DCP दर्जाच्या अधिकाऱ्याकडे सोपवला होता. रिपब्लिकने कोणताही घोटाळा केल्याचे तपासात आढळले नाही. अर्णब यांना क्लिनचीट मिळत असल्याचे लक्षात येताच DCP ची वाहतूक खात्यात बदली करण्यात आली.” असा घणाघात त्यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या-