अण्णांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस ; एका आंदोलकाची प्रकृती बिघडली

अण्णा हजारे

टीम महाराष्ट्र देशा : जनलोकपालसह इतर मागण्यांसाठी दिल्लीतील रामलीला मैदानावर उपोषणाला बसलेल्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं वजन 2 किलोने घटलं आहे. तर एका आंदोलकांची प्रकृती बिघडली आहे. आज या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे.

आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशीही सरकारकडून तोडगा काढण्याचे कोणतेही प्रयत्न झालेले नाहीत. पहिले दोन दिवस अण्णांच्या आंदोलनाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे आज रविवारी आंदोलनाला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं औत्सुक्याचं असेल.

अण्णांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस पहा काय म्हणतात अण्णा 

महाराष्ट्रात वाढता पाठींबा 

अण्णा हजारे यांना रामलीला मैदानावर प्रतिसाद म्हणावा तसा दिसत नसला तरी महाराष्ट्रातून मात्र अण्णांना पाठींबा वाढत आहे. पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात अण्णांच्या समर्थनार्थ आंदोलन सुरु झाले आहे.

दुसरीकडेसाताऱ्यामध्ये सुद्धा आंदोलनास सुरवात झाली आहे.

लातूर मध्ये आंदोलनास सुरवात

मुंबई मध्ये आझाद मैदानात अण्णांच्या समर्थनार्थ आंदोलन सुरु

नाशिक मध्ये सुद्धा सत्याग्रह आंदोलन

नागपूर मध्ये आंदोलन 

तिकडंं अण्णांचं गाव असणाऱ्या राळेगणसिद्धी मध्ये सलग दुसऱ्या दिवशी कॅन्डेल मार्च काढत अण्णांना गावकऱ्यांनी पाठींबा दिला आहे.Loading…
Loading...