दाऊदच्या हॉटेलच्या जागी भव्य शौचालय बांधणार- स्वामी चक्रपाणी

यापूर्वी स्वामी चक्रपाणी यांनी दाऊदची कार विकत घेवून पेटवून दिली होती 

मुंबई : मागे देखील दाऊदच्या संपत्तीचा लिलाव करण्यात आला होता त्यावेळी हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी यांनी दाऊदची कार विकत घेतली होती आणि नंतर दहशतवादाचं प्रतिक सांगून गाजियाबादमध्ये ही चारचाकी पेटवून दिली होती. आता दहशतवादी दाऊद इब्राहिच्या मुंबईतील  संपत्तीचा लिलाव होणार असून 14 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या लिलावात हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी सहभागी होऊन दाऊदच्या अफरोज हॉटेलवर ते बोली लावणार आहेत. जर स्वामी चक्रपाणी यांना अफरोज हॉटेल विकत घेण्यात यश आलं तर ते हॉटेलच्या जागी भव्य शौचालय बांधणार आहेत.या हॉटेलची किंमत 1 कोटी 15 लाख रुपये आहे.  येत्या 14 नोव्हेंबर रोजी पाकमोडिया स्ट्रीटवरील दाऊदच्या संपत्तीचा लिलाव केला जाणार आहे.

 

You might also like
Comments
Loading...