fbpx

खतना ही अमानुष प्रथा बंद करा;दाऊदी बोहरी समाजातील महिलांचे पंतप्रधान मोदींना पत्र

dawoodi-bohra-women

टीम महाराष्ट्र देशा- खतना ही अमानुष प्रथा बंद व्हावी यासाठी दाऊदी बोहरा समाजातील महिलांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.भारतात महिलांच्या गुप्तांगाच्या विद्रुपीकरणाविरोधात (एफजीएम) कोणताही कायदा अस्तित्वात नाही. जगातील अनेक देशांप्रमाणे भारतात आजही काही मागास प्रथांचे अनुकरण केले जाते. त्यामुळे केंद्र सरकारने राज्यांना आणि दाऊदी बोहरा समाजाच्या धर्मगुरूंना याबाबत किमान निर्देश दिले पाहिजेत. या निर्देशातंर्गत ‘खतना’ या प्रथेला भारतीय दंडसंहिता आणि पॉस्को कायद्यातंर्गत गुन्हा ठरवण्यात यावे, अशी मागणी दाऊदी बोहरी समाजाच्या महिलांनी पत्राद्वारे केली आहे.

जगभरातील दाऊदी बोहरा या मुस्लीम समाजात धार्मिकतेच्या नावाखाली सुरु असलेल्या खतना(सुंथा) प्रथेमुळे महिलांचे शारीरिक आणि मानसिक खच्चीकरण होत असून ही प्रथा मुलींचे लैंगिक शोषण करणारी आहे. महिलांना यातना देणाऱ्या ही प्रथा संपुष्टात आणण्याची वेळ आता जवळ येऊन ठेपली आहे, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.भारतीय दंडसंहितेमधील कलम ३१९ ते ३२६ या कलमांमध्ये दुखापत आणि गंभीर इजा पोहोचवणाऱ्या गुन्ह्यांसाठी शिक्षा नमूद करण्यात आल्या आहेत. याशिवाय, FGM ला पॉस्को कायद्यात नमूद करण्यात आलेल्या लैंगिक शोषणाची व्याख्या लागू पडते, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

 खतना करण्याच्या विविध अमानुष पद्धती 
खतना करण्यासाठी तीन पद्धतीचा अवलंब केला जातो. पहिल्या पद्धतीत योनीलिंगावरील त्वचा कापली जाते. दुसऱ्या पद्धतीत योनीलिंग आणि त्याबाहेरील आवरणाचा काही भाग कापला जातो तर तिसऱ्या पद्धतीत योनीचा खुला भाग कमी करण्यासाठी स्त्रीयांचे बाह्य जननेद्रिंयांना टाके घातले जातात.

2 Comments

Click here to post a comment