दाऊद इब्राहिम पुन्हा मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याच्या तयारीत?

mumbai serial blast and dawood

मुंबई : दाऊद इब्राहिम पुन्हा मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडवण्याचा कट रचत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबई पोलिसांनी पाकिस्तानात राहणारा दाऊदचा भाऊ आणि भारतातील त्याच्या साथीदारामधील दुरध्वनीवर संभाषण ध्वनीमुद्रित केले आहे.

याबाबतची माहिती मुंबई पोलिसांकडून केंद्र सरकारला देण्यात आली आहे. यावरुन दाऊदचे अनेक लोक भारतात सक्रिय असल्याचे स्पष्ट होत आहे. २४ वर्षांपूर्वीसारखाच साखळी बॉम्बस्फोट घडवण्याचा दाऊदचा मानस आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

यामुळे दाऊदच्या या कटात सहभागी असलेल्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलीस आणि केंद्रीय तपास यंत्रणांसमोर आहे.