पुन्हा एकदा मुंबईवर हल्ला करण्याचा दाऊदचा ना’पाक’ प्लॅन

वेबटीम: 1993 च्या मुंबई बॉम्ब ब्लास्टमधील मुख्य आरोपी कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम पुन्हा एकदा मुंबईत घातपाताची तयारी करत आहे.  पाकिस्तानात राहत असलेल्या दाऊद इब्राहिम आणि त्याच्या भारतातील हस्तकांचा संवाद मुंबई पोलिसांनी इंटरसेप्ट केला आहे. या सर्व गोष्टीची माहिती केंद्र सरकारला देण्यात आली आहे.

‘टाईम्स नाऊ’च्या रिपोर्टनुसार दाऊद आणि त्याचे हस्तक मुंबईत मोठा घातपात करण्याच्या तयारीत आहेत. डी कंपनीतील काही लोक हे त्याचा प्लॅन पूर्णत्वास नेण्याची तयारी करत आहेत. अशात दाऊदचा भाऊ आणि भारतातील त्याच्या माणसांसोबत त्याचं झालेलं बोलणं इंटरसेप्ट केल्याने एक मोठा खुलासा झाला आहे.