कर्णधार पदानंतर संघात स्थान न दिल्याने डेव्हिड वॉर्नरचा भाऊ हैदराबादच्या संघ व्यवस्थापनावर भडकला

दिल्ली : आयपीएलमध्ये रविवारी झालेल्या पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने सनरायझर्स हैदराबाद संघाचा ५५ धावांनी पराभव केला. राजस्थानने दिलेल्या २२१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादचा संघ केवळ १६५ धावापर्यंत मजल मारु शकला. धडाकेबाज शतकासाठी राजस्थानचा सलामीवीर जोस बटलरला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

२०२१ आयपीएल स्पर्धेत आलेल्या अपयशानंतर सनरायझर्स हैदराबाद संघाने डेव्हीड वॉर्नरची कर्णधार पदावरुन उचलबांगडी केली. यानंतर तर अंतिम ११ मध्ये स्थानही दिले नाही. लागोपाठ घडलेल्या या घटनेनंतर वॉर्नरचे अनेक चाहते नाराज होते. यात आता वॉर्नरचा भाऊ स्टीव वॉर्नरनेही उडी घेत संताप व्यक्त करत इन्स्टाग्राम वर एक पोस्ट शेअर केली. राजस्थान विरुद्धच्या सामन्यात डेविड वॉर्नर ‘वॉटर बॉयची’ भूमिका पार पाडताना दिसून आला होता. यावर संताप व्यक्त करत डेविड वॉर्नरचा भाऊ स्टीव वॉर्नरने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत फ्रॅंचाईजीला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. यात स्टीव म्हणतो की, ‘गेल्या काही वर्षापासुन एका खेळाडूने संघाला संभाळुन घेतले होते. तुमच्या संघाची समस्या सलामी फलंदाजी नाही तर मधली फळी ही खरी समस्या आहे. किती बरे होईल जर तुमची मधली फळी तुमच्या संघासाठी धावा करेल.’

स्टीव्ह वॉर्नरने त्याच्या पोस्टमध्ये हैदराबाद संघाला टॅग करत भाऊ डेविड वॉर्नरची २०१४ पासूनची आकडेवारी शेअर केली. त्याचे म्हणणे होते की संघातील मधली फळी अपयशी ठरत आहे. तीथे समस्या आहे. सलामी फलंदाजी ही समस्याच नाही. यंदाच्या स्पर्धेत हैदराबादने डेविड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली , ६ सामन्यात केवळ एकच विजय मिळवण्यात यश आले. तर एक सामना सुपर ओव्हरपर्यंत गेला होता. तर रविवारी झालेल्या डेव्हिड वॉर्नरच्या अनुपस्थितीत हैदराबादला राजस्थान संघाविरुद्ध ५५ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.

महत्वाच्या बातम्या