टीम महाराष्ट्र देशा: ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (AUS vs ENG) यांच्यामध्ये सुरू असलेल्या तिसऱ्या एक दिवसीय सामन्यामध्ये डेव्हिड वॉर्नर (David Warner) ने प्रदीर्घ काळानंतर आपल्या शतकाचा दुष्काळ संपवला आहे. यामध्ये त्याने इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यांमध्ये 106 धावा केल्या. यामध्ये त्याने 102 चेंडूमध्ये 106 धावा केल्या आहेत. त्याने यात 2 षटकार आणि 4 चौकार लगावले आहेत. वॉर्नरबरोबर दुसरा सलामीवीर फलंदाज ट्रॅव्हिस हेडनेही 130 चेंडूमध्ये 152 धावा करत आपली कामगिरी सिद्ध केली आहे. त्याने यामध्ये 4 षटकार आणि 16 चौकार लगावले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या या दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी 269 गावांची मोठी भागीदारी केली.
या सामन्यादरम्यान डेव्हिड वॉर्नरच्या वनडे मध्ये 6000 धावा पूर्ण झाल्या आहेत. त्याने आत्तापर्यंत 141 सामन्यांमध्ये 139 डाव खेळून 45 च्या सरासरीने 6000 धावा पूर्ण केल्या आहेत. ज्यामध्ये 23 अर्धशतक आणि 19 शतकांचा समावेश आहे. सध्या डेव्हिड वॉर्नरचा स्ट्राइक रेट 95 एवढा आहे.
वनडे मध्ये ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक शतके करण्याच्या बाबतीत डेव्हिड वॉर्नर आता दोन नंबरवर पोहोचला आहे. डेव्हिड वॉर्नरने माजी दिग्गज क्रिकेटपटू मार्क वॉला याला मागे सोडले आहे. मार्क वॉला याने 244 एकदिवशी सामन्यांमध्ये 18 शतके लगावली होती. तर आता दुसरीकडे वॉर्नरच्या नावावर 19 शतके नोंदवण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियन संघाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगच्या मागोमाग आता डेव्हिड वॉर्नरचे नाव आहे.
डेव्हिड वॉर्नरचा कसोटीतील विक्रम ही उत्कृष्ट आहे. वॉर्नरने आत्तापर्यंत 96 सामन्यांमध्ये 176 डाव खेळत 47 च्या सरासरीने 7617 धावा केल्या आहेत. यामध्ये वॉर्नरच्या 335 नाबाद खेळीचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियन संघाकडून कसोटी, एकदिवसीय आणि टी 20 या तिन्ही फॉरमॅटमध्ये सर्वाधिक शतकांमध्ये डेव्हिड वॉर्नर आता दुसऱ्या स्थानकावर आहे. यामध्ये आतापर्यंत त्याने 376 सामन्यांमध्ये 44 शतके झळकावली आहेत.
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Raut | संजय राऊतांच्या ‘त्या’ भाकीतवर शिंदे गटाकडून प्रत्युत्तर, म्हणाले…
- Vinayak Raut | “ज्या पद्धतीने कावीळ झालेल्या व्यक्तींना…” ; विनायक राऊतांचे प्रतापराव जाधवांना प्रत्युत्तर
- Raj Thackeray | “राजकारणात मी अपघाताने आलो…” ; राज ठाकरे यांची मोठी प्रतिक्रीया
- Raj Thackeray | राज ठाकरे काढणार शिवरायांवर चित्रपट, घोषणेच्या वेळी म्हणाले…
- Chandrashekhar Bawankule | “राज्यपालांच्या वक्तव्याचे समर्थन करत नाही, पण…” ; चंद्रशेखर बावनकुळेंचे गोलमाल उत्तर