दौंड : आमदारांच्या आश्र्वासनानंतर उपोषण मागे

दौंड , सचिन आव्हाड – दौंड तालुक्यातील पाटस येथे पाटस ग्रामविकास फाऊंडेशन आणि पाटस पंचक्रोशीतील ग्रामस्थांमार्फत पाटस येथे बस डेपो व्हावा यामागणीसाठी सुरू असलेले उपोषण काल दि . १२ आॅगस्ट रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास आमदार राहुल कुल यांच्या आश्र्वासनानंतर मागे घेण्यात आले . आमदार कुल यांनी पाटस येथे बस डेपो होण्यासाठी मदत करण्याचे यावेळी जाहीर केले .

शनिवार दि . ११ आॅगस्ट रोजी सकाळी ८ वाजता उपोषण सुरू करण्यात आले होते . गणेश जाधव , हर्षद बंदिष्टि , विनोद कुरुमकर हे तिघे उपोषणाला बसले होते .पाटस पंचक्रोशीतील ग्रामस्थ , विद्यार्थी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचा या उपोषणास पाठिंबा मिळत होता . अनेक नागरिक , राजकीय पक्ष , संघटना यांच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषण ठिकाणी भेट देऊन उपोषणाला पाठिंबा दिला होता.

उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी १० वाजण्याच्या सुमारास दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी उपोषण स्थळी उपोषण कर्त्यांची भेट घेऊन पाटस येथे बस डेपो होण्यासाठी आवश्यक मदत करण्याचे जाहीर केले . बस डेपो होण्यासाठी नागरिकांनीही पाठपुरावा करावा असे कुल यांनी सांगितले . आमदार कुल यांनी बस डेपो होण्यासाठी मदत करण्याचे जाहीर केल्यानंतर उपोषण कर्त्यांनी आणि पाटस पंचक्रोशीतील नागरिकांनी कुल यांचे आभार मानले.

भिमा पाटस गाऴपाची तयारी सुरु