कॉंग्रेसला खिंडार ‘या’ मात्तबर नेत्याचे कन्या – पुत्र भाजप-सेनेच्या वाटेवर

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस – राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी भाजप सेनेत प्रवेश केला आहे. तर काही नेते पक्षांतराच्या तयारीत आहेत. त्यामुळे निवडणुकी आधीचं काही जिल्ह्यांमध्ये कॉंग्रेस राष्ट्रवादीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. नंदुरबारमध्ये देखील अशीच परिस्थिती होणार असल्याची शक्यता आहे. कारण नंदुरबारचे नऊ वेळा खासदार राहिलेले माणिकराव गावित यांचे पुत्र भरत गावित कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.तर माणिकराव गावित यांच्या कन्या आणि इगतपुरीच्या आ. निर्मला गावित उद्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

लोकसभा निवडणुकीत मुलाला उमेदवारी न मिळाल्याने माणिकराव गावित हे कॉंग्रेसच्या पक्ष श्रेष्ठींवर नाराज होते. त्यावेळीच माणिकराव गावित आणि पुत्र भरत गावित भाजपमध्ये प्रवेश करणार होते. मात्र त्यावेळी हा प्रवेश थांबला होता. तर माणिकराव गावित यांनी कॉंग्रेसच्याचं बाजूने राहण्याचा निर्णय घेतला. मात्र आता पुन्हा गावित यांच्या पक्ष प्रवेशाची चर्चा सुरु झाली आहे. तर भरत गावित भाजप प्रवेशाच्या तयारीत आहेत.

तर दुसरीकडे माणिकराव गावित यांची कन्या निर्मला गावित या शिवसेनेत प्रवेश करणर आहेत. त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरचं नंदुरबार आणि इगतपुरीमध्ये कॉंग्रेसला दणका बसला आहे. निर्मला गावित या इगतपुरीमधून सलग दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. त्यामुळे निर्मला गावित यांच्या बरोबर अनेक कार्यकर्तेही शिवसेनेत जाणार आहेत.