फक्त दोन हजारांसाठी मुलीनेच केला आईचा देह विक्रीसाठी सौदा

crime

ठाणे : डोंबिवलीमध्ये वेश्या व्यवसाय करणाऱ्या एका २३ वर्षीय दलाल तरुणीने दोन हजार रुपयांसाठी आपल्या आईचा देह विक्रीसाठी सौदा केल्याची घटना उघडकीस आली आहे.हेमा करोतिया असे दलाल तरुणीचे नाव असून डोंबिवली रेल्वे स्थानकाजवळील एका हॉटेलमधून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तिला ताब्यात घेण्यात आले. यावेळी पीडित आईसह अन्य एका तरुणीचीही सुटका करण्यात आली. हेमा मोबाईलवरुन ग्राहकांशी संपर्क साधून देह विक्रीसाठी मुली उपलब्ध असल्याचे सांगत असे. आपल्या जन्मदात्या आईचाच देह विक्रयासाठी सौदा करणाऱ्या हेमाविरोधात विष्णुनगर पोलीस ठाण्यात पिटा कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Loading…


Loading…

Loading...