डैटसनने लॉन्च केले आपल्या एंट्री-लेवल हैचबैक रेडी-गो चे लिमिटेड एडिशन !

टीम महाराष्ट्र देशा : डैटसनने आपली एंट्री-लेवल हैचबैक रेडी-गो चे लिमिटेड एडिशन लॉन्च केले आहे. या लिमिटेड एडिशन मध्ये 0.8 लीटर आणि 1.0 लीटर पेट्रोल इंजन येणार आहे. यामध्ये फक्त मैनुअल गियरबॉक्स असणार आहे.

रेडी-गो 0.8 लिमिटेड एडिशन कारची किमत 3 लाख 58 हजार रुपये असणार आहे तर रेडी-गो 1.0 लिमिटेड एडिशनची किमत 3.85 लाख रुपये असणार आहे.

लिमिटेड एडिशन मध्ये काही कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहेत. जे या मॉडेलला रेग्यूलर मॉडल पेक्षा वेगळे बनवत आहे. यामध्ये रूफ रैप, बॉडी ग्राफिक्स, फ्रंट आणि रियर बंपर अंडर कवर, ग्रिल वर रेड हाइलाइटर, टेलगेट ग्राफिक्स, रेड आणि ब्लैक लैदर अपहोल्स्ट्री, रियर पार्किंग सेंसर, स्टेन क्रोम गियर बैजल, इनसाइड डोर हैंडल वर क्रोम फिनिशिंग आणि कारपेट मैट दिले आहेत. हि कार तीन रंगामध्ये उपलब्ध आहे त्यामध्ये व्हाइट, सिल्वर आणि रेड हे रंग आहेत.

निवडणुका विदेशात पण टेन्शन भारताला