राष्ट्रवादीच्या ‘या’ झुंजार नेत्याचे झाले कोरोनामुळे निधन; दिग्गज नेत्यांनी व्यक्त केला शोक

ncp

जुन्रर – जुन्रर पंचायत समितीचे माजी सभापती दशरथ पवार यांचा कोरोनाशी लढा अयशस्वी झाला आहे. वयाच्या 67 व्या वर्षी त्यांचं कोरोनाने निधन झालं आहे. गेल्या 15 दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. News 18 लोकमतने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

त्यांच्यावर एका खाजगी रूग्णालयात उपचार सुरू होते. परंतू त्यांना मधुमेहाचा आणि रक्तदाबाचा त्रास असल्याने त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. अखेर आझ सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.दशरथ पवार यांच्या निधनानंतर अनेक दिग्गज नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.

पारुंडे हे त्यांचे मूळ गाव. येथे भरणाऱ्या नाथपंथी साधूंच्या कुंभमेळा समितीचे ते अध्यक्ष होते. दशरथ पवार हे माजी आमदार वल्लभ बनके यांचे खंदे समर्थक होते.चौथीच्या मुलांसाठी चावडी वाचन हा उपक्रम सुरु करणारे जिल्हा परिषद सदस्य अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या अशा जाण्याने शोककळा पसरली आहे.

जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून गेल्यानंतर पवार हे जुन्नर तालुका पंचायत समितीचे सन 1992 ते 1997 या सलग पाच वर्षांत सभापती होते. त्यांच्या कार्यकाळात जिल्हा परिषदेचा उत्कृष्ट पंचायत समितीचा पुरस्कार मिळाला होता.

महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –

‘नागरिकांच्या सहकार्याशिवाय ‘कोरोना’ संसर्गावर नियंत्रण मिळवता येणे शक्य नाही’

‘सरकारच्या ऑनलाईन शिक्षणात गरीब, आदिवासी विद्यार्थ्यांचा विचारच नाही’