शिक्षणसंस्थेची दादागिरी! भरमसाठ पैसे भरून सुद्धा शिक्षण घेण्यासाठीच विद्यार्थांना लढावं लागत

ibs pune

संदीप कापडे / पुणे: देशातील नामवंत शिक्षण संस्था म्हणून प्रसिद्ध असलेले इंटरनॅशनल बिझनेस स्कूल अर्थात ICFAI बिजनेस स्कूल, हडपसर येथे देशभरातून अनेक विद्यार्थी शिक्षण घेण्यास येतात. मात्र फक्त नावानेच मोठे असलेली ही संस्था कर्तुत्व शून्य आहे. विद्यार्थ्यांची आर्थिक लूट, मानसिक त्रास , धमकी देने असे प्रकार या महाविद्यालयात चालतात. महाविद्यालयात सर्रास शिक्षणाचा धंदा मांडून ठेवला आहे. अश्या तक्रारी अनेक विद्यार्थांकडून येत आहेत.

Loading...

दरम्यान, संस्थेचे डायरेक्टर डॉ. नरसिंग राव यांच्यासोबत संपर्क केला असता. “विद्यार्थांनी केलेल्या सदर तक्रारीत काहीच तथ्य नसून यातील खूप गोष्ठी खोट्या आहेत. मी मिटिंग मध्ये असल्यामुळे बोलू शकत नाही.” असे संगीताले.

आयसीएफयेआय बिजनेस स्कूल येथे दरवर्षी विद्यार्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. या संदर्भात विद्यार्थांनी संस्थेकडे अनेक तक्रारी केल्या मात्र त्यानंतर शिक्षकांकडून विद्यार्थांचा राग मनात धरून त्यांना परीक्षेत नापास करण्यात येते. विद्यार्थी या बिजनेस स्कूल मध्ये ७.५ लाख रुपये फी भरून शिक्षण घेतात. तसेच बरेच विद्यार्थी येथे राज्याबाहेरील आहेत. एवढी फी भरून सुद्धा पाहिजे तसं शिक्षण, सुविधा नसल्यामुळे विद्यार्थांनी रोष व्यक्त केला आहे.

विद्यार्थांनी दिलेल्या तक्रारी नुसार, अत्यंत उच्च दर्जाची म्हणवणाऱ्या संस्थेत अतिशय असंवेदनशील शिक्षक, कर्मचारी वर्ग, ह्यांचा भरणा असून विद्यार्थी, पालक ह्यांना अत्यंत वाईट पद्धतीने वागणूक दिल्या जाते.

काहीदिवसांपूर्वी या संस्थेत परीक्षांच्या काळात ह्या वर्षीच्या पहिल्या सहामाही पेपरफुटी चे प्रकरण उघडीस आले होते. त्यानंतर संस्थेकडून ते प्रकरण दाबण्यात आले. विद्यार्थांना पेपर पुनर्मुल्यांकन करून दिले जाणार नाहीत. अशी भूमिका संस्थेने घेतली होती. सदर प्रकारानंतर विद्यार्थांनी घोषणा दिल्या. त्यानंतर कॉलेज प्रशासनाला जागा आली. विद्यार्थांना पैसे भरून सुद्धा शिक्षण घेण्यासाठी लढाव लागत आहे. ही परिस्थिती या संस्थेत निर्माण झाली आहे.

आशुतोष परवते (विद्यार्थी) यांनी सांगितल्याप्रमाणे विद्यार्थ्यांना परीक्षेचे पेपर न दाखवणे, हेड ऑफिस ने सांगितले आहे ह्या नावाखाली फ्रेशर्स अथवा फेरवेल पार्ट्यांकरता विद्यार्थ्यांकडून जबरदस्ती पैसे वसूल करण्यात येतात. तसेच विद्यार्थांच्या वैयक्तिक व्हाट्सएप्प ग्रुपवरच्या गोष्टी वाचून, त्या ग्रुपशी कोणत्याही शिक्षकाचा कुठलाही संबंध नसतांना विद्यार्थांना त्यासाठी शिक्षा करण्याचे प्रकार, परीक्षेमध्ये विद्यार्थांना जाणून बुजून १-२ मार्कांनी विषयात नापास करण्यात येते. त्यानंतर त्याच विषयाच्या पुनर्परीक्षेसाठी २५०० रुपये उकळल्या जातात. त्यात मुलांना परत नापास करणे, असे प्रकार सुद्धा या संस्थेत घडले आहेत.

काही विद्यार्थांची सिरीयस ऑपरेशन्स झालेली असताना. त्यांनी सर्व मेडिकल सर्टिफिकेट्स देऊन सुद्धा मुलांना हजेरी न देता त्यांना परीक्षेला बसण्यापासून रोखणे आणि नंतर त्याच परीक्षे साठी विषयी २५०० रुपये प्रमाणे फी घेऊन मगच च बसू देणे, अशे अत्यंत निंदनीय प्रकार संस्थेत घडत आहेत.

 Loading…


Loading…

Loading...