धारूर तालुक्यातील कासारीमध्ये डेंग्यू, मलेरियाची साथ

dengu

टीम महाराष्ट्र देशा –किल्ले धारूर तालुक्यातील कासारी बोडखा या गावामध्ये गेल्या आठ दिवसांपासून डेंग्यू, मलेरियामुळे तापेने गाव फणफणले आहे. गावातील शंभरच्या आसपास रुग्ण खासगी रुग्णालयांसह अंबाजोगाईच्या स्वाराती ग्रामीण रुग्णालयात ऍडमिट करण्यात आले आहे. कालपासून भोगलवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी गावात ठाण मांडून आहेत. संपूर्ण बीड जिल्ह्यासह ग्रामीण भागातही कधी नव्हे ते डेंग्यूने डोके वर काढलेले आहे. या आजाराचे लोण जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही पसरले आहे.

Loading...

धारूर तालुक्यातील कासारी या गावातही गेल्या आठ दिवसांपासून डेंग्यू, मलेरियाचे अनेक रुग्ण आढळून आले आहेत. सुरुवातीला आरोग्य यंत्रणेने याकडे दुर्लक्ष केले होते. अनेक रुग्ण खासगी आणि अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. तसेच भोगलवाडीच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिका-यांनी याची गांभीर्याने दखल घेऊन यंत्रणा हलविली असून कालपासून गावातील रुग्णांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. सुरुवातीला आरोग्य यंत्रणेने दुर्लक्ष केल्यामुळे येथील काही गावक-यांनी भोगलवाडी प्राथमिक आरोग्य केेंद्राच्या अधिका-याला याबाबत जाब विचारला होता. जिल्हा पातळीवर आरोग्य यंत्रणेच्या अधिका-यांनीही गावामध्ये धाव घेतलेली आहे.Loading…


Loading…

Loading...