Dark Spots | चेहऱ्यावरील डागांची समस्या दूर करण्यासाठी कोरफडीचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Dark Spots | टीम कृषीनामा: कोरफड आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. त्याचबरोबर त्वचेची संबंधित अनेक समस्या दूर करण्यासाठी कोरफड प्रभावी ठरू शकते. कोरफडीमध्ये आढळणारे गुणधर्म त्वचेशी संबंधित समस्या दूर करतात. कोरफडीमध्ये अँटीबॅक्टरियल आणि अँटिइफ्लिमेंटरी गुणधर्म आढळून येतात, जे त्वचेची काळजी घेण्यास मदत करतात. कोरफडीच्या मदतीने चेहऱ्यावरील डागांची समस्या दूर होऊ शकते. पुढील पद्धतीने कोरफडीचा वापर करून चेहऱ्यावरील डाग दूर केल्या जाऊ शकतात.

कोरफड आणि लिंबाचा रस (Aloevera and lemon juice-For Dark Spots)

चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी कोरफड आणि लिंबाचा रस फायदेशीर ठरू शकतो. यासाठी तुम्हाला कोरफडीच्या गरामध्ये लिंबाचा रस मिसळून घ्यावा लागेल. त्यानंतर तुम्हाला हे मिश्रण दहा मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. दहा मिनिटानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. लिंबामध्ये आढळणारे सायट्रिक ऍसिड त्वचेवरील डाग दूर करण्यास मदत करतात. त्यामुळे त्वचेवरील डाग दूर करण्यासाठी कोरफड आणि लिंबाचा रस फायदेशीर ठरू शकतो.

कोरफड आणि मुलतानी माती (Aloevera and Multani soil-For Dark Spots)

त्वचेची काळजी घेण्यासाठी आणि चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी कोरफड आणि मुलतानी माती फायदेशीर ठरू शकते. यासाठी तुम्हाला एक चमचा मुलतानी मातीमध्ये आवश्यकतेनुसार कोरफडीचा गर आणि गुलाब जल मिसळून घ्यावे लागेल. हे मिश्रण तुम्हाला साधारण पंधरा मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. या मिश्रणाच्या मदतीने त्वचेवरील अतिरिक्त तेलकटपणा निघून जाण्यास मदत होते.

कोरफड आणि कडुलिंबाची पाने (Aloevera and neem leaves-For Dark Spots)

चेहऱ्यावरील डाग आणि पिंपल्स दूर करण्यासाठी कोरफड आणि कडुलिंबाची पेस्ट उपयुक्त ठरू शकते. यासाठी तुम्हाला कोरफडीच्या गरामध्ये कडुलिंबाच्या पानांची पेस्ट मिसळून घ्यावी लागेल. हे मिश्रण तुम्हाला साधारण अर्धा तास चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. अर्धा तासानंतर तुम्हाला तुमचा चेहरा थंड पाण्याने धुवावा लागेल. हा फेस पॅक तुम्ही आठवड्यातून दोन वेळा चेहऱ्यावर लावू शकतात.

त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही वरील पद्धतीने कोरफडीचा वापर करू शकतात. त्याचबरोबर त्वचेला चमकदार बनवण्यासाठी तुम्ही बेसनाचा पुढील प्रमाणे वापर करू शकतात.

बेसन आणि दही (Skin Care With Besan and Curd)

चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही बेसन पिठात दही मिसळू शकतात. दह्यामध्ये मॉइश्चरायझिंग गुणधर्म आढळून येतात, जे त्वचेला निरोगी ठेवण्यास मदत करतात. यासाठी तुम्हाला दोन चमचे बेसनामध्ये तीन चमचे दही मिसळून घ्यावे लागेल. हे मिश्रण तुम्हाला साधारण वीस मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. वीस मिनिटानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. नियमित बेसन आणि दह्याची पेस्ट चेहऱ्याला लावल्याने चेहऱ्याचा रंग सुधारू शकतो.

बेसन आणि ग्रीन टी (Skin Care With Besan and Green tea)

चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही बेसन आणि ग्रीन टीचा वापर करू शकतात. या दोघांच्या मिश्रणाने खराब झालेली त्वचा दुरुस्त होण्यास मदत होते. यासाठी तुम्हाला ग्रीन टीमध्ये दोन चमचा बेसन मिसळून घ्यावे लागेल. हे मिश्रण व्यवस्थित तयार झाल्यानंतर तुम्हाला साधारण वीस मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

Skin Care | फेशियल केल्यानंतर चेहऱ्यावरील चमक कायम ठेवण्यासाठी वापरा ‘या’ गोष्टी

Camphor And Coconut Oil | केसांना खोबरेल तेल आणि कापूर लावल्याने मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे

Wheat Flour | नैसर्गिक पद्धतीने त्वचेची काळजी घेण्यासाठी गव्हाच्या पिठाचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Skin Care With Coffee | चेहरा स्वच्छ करण्यासाठी कॉफीचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Maida Side Effects | मैद्यापासून बनलेल्या पदार्थांचे सेवन केल्याने आरोग्याला भोगावे लागू शकतात ‘हे’ दुष्परिणाम

Back to top button