दरेकर, महाजन आणि लाड यांनी मुख्यमंत्र्यांची गाडी थांबवली अन् नार्वेकर म्हणाले, यांच्या हाती शिवबंधन बांधा !

cm

मुंबई : राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा संघर्ष टोकाला गेला आहे. काँग्रेसने केलेली स्वबळाची भाषा, शिवसेना आमदार प्रताप सरकार यांनी भाजपसोबत पुन्हा युती करण्याची मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केलेली मागणी यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात हालचाली वाढल्या आहेत. अशातच आता एक किस्सा समोर येत आहे, ज्याची चर्चा राजकीय क्षेत्रात जोरदार सुरु आहे.

भाजप-शिवसेनेची युती तुटली असली तरी दोन्ही पक्षांमधील नेत्यांची अनेक दशकांची मैत्री ही कायम आहे. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप नेते गिरीश महाजन, आमदार प्रसाद लाड आणि उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाययक मिलिंद नार्वेकर यांची अवघी काही क्षणांची अचानक भेट चर्चेचा विषय ठरली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधान भवनातील बैठक संपवून गाडीतून जात असताना अचानक प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड आणि गिरीष महाजन तिथे आले यावेळी मिलिंद नार्वेकर आणि या नेत्यांमध्ये गंमतीदार संवाद झाला. या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची गाडी थांबवून काही चर्चा केली. दरम्यान, मैत्री आणि संबंध जवळचे असल्याने आमच्यामध्ये वैयक्तिक चर्चा झाली असं स्पष्टीकरण गिरीश महाजन यांनी दिलं आहे.

दरम्यान, सध्या प्रचंड आक्रमक झालेल्या या नेत्यांमध्ये हास्यविनोद रंगल्याचं समोर आलं आहे. मिलिंद नार्वेकर म्हणाले, ‘ उद्धव साहेब, यांनी तुम्हाला घेरण्याचा प्रयत्न केला आहे का? त्याचवेळी प्रविण दरेकर म्हणाले. आम्ही केव्हाही येऊ शकतो. दरेकरांचे हे वाक्य ऐकताच मिलिंद नार्वेकर म्हणाले यांना आताच गाडीत टाका, शिबबंधन बाधूया हे ऐकून दरेकर म्हणाले आम्ही केव्हाही एकत्र येऊ शकतो, हे आमचे मूळ आहे.’ यावेळी या नेत्यांमध्ये हशा पिकला.

महत्वाच्या बातम्या