बंगालमध्ये वाघीण जिंकली म्हणणारे, हिंसाचाराच्या घटनेवर मुग गिळून गप्प आहेत!

मुंबई : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसक घटना घडत आहेत. या घटनांमध्ये भाजपच्या ११ पदाधिकाऱ्यांची हत्या झाल्याचा आरोप भाजपच्या वतीने करण्यात आला आहे. या घटनेवर राज्यातील नेते मुग गिळून गप्प बसले असल्याची टीका विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

या संदर्भात दरेकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विरोधकांवर टीका केलीय. त्यांनी लिहिले की, ‘विचारांची लढाई विचारांनी लढली जावी, तिथे हिंसाचारास थारा नसावा! निवडणुकीनंतर बंगालमध्ये सुरू असलेला हिंसाचार अतिशय निंदनीय असून, हे थांबले पाहिजे! बंगालमध्ये वाघीण जिंकली म्हणणारे, हिंसाचाराच्या घटनेवर मुग गिळून गप्प आहेत!
अशा घटनांचे समर्थन होऊ शकते का? बंगालमध्ये भाजपकडे गमावण्यासारखं काहीही नव्हतं! आज जेवढे आमदार निवडून आले आहेत, त्यामागे स्थानिक कार्यकर्त्यांचे समर्पन आहे. बंगालमध्ये वाढलेल्या जागा व मतांची वाढलेली टक्केवारी ही कार्यकर्त्यांना समर्पित आहे. परंतु ही हिंसा थांबली पाहिजे!’

पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाऱ्याच्या घटनेनंतर महाविकास आघाडीच्या एकाही नेत्यांने त्यावर मत व्यक्त केलेले नाही. मात्र, ममता बॅनर्जी यांच्या विजयानंतर अनेकांनी ममता यांचे अभिनंदन तर भाजपवर टीका केली होती. त्यामुळे दरेकर यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका करत या घटनेबाबत प्रश्न उपस्थित केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या