आघाडीवरून दिल्लीत खलबत; राहुल गाधींनी घेतली शरद पवारांची भेट

दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज दिल्लीत राहुल गाधींनी यांनी शरद पवारांची भेट घेतली. दिल्लीतील संध्याकाळच्या सुमारास शरद पवारांच्या 6 जनपथ या निवासस्थानी ही भेट झाली. या भेटीत महाराष्ट्रातील ४० जागांचा प्रश्न निकाली निघाला आहे. त्यामुळे आपल्या आपल्या जागांवर दोन्ही पक्ष ताबडतोब कमला लागल्याचे कळते आहे.

Loading...

येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्यासाठी विरोधी पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग आज राजधानी दिल्लीमध्ये पाहायला मिळाला. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आणि महाराष्ट्रातील ४८ जागांच्या आघाडीबाबत सविस्तर चर्चा केली.

दिल्लीतील संध्याकाळच्या सुमारास शरद पवारांच्या 6 जनपथ या निवासस्थानी ही भेट झाली. यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे हे देखील उपस्थित होते. तर राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल उपस्थित होते. या भेटीची माहिती शरद पवारांनी ट्विटरद्वारे दिली आहे. परंतु आघाडीबाबत सविस्तर काय चर्चा झाली याचा तपशील मिळाल नाही. शरद पवार यांनी आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काय रणनिती असावी याबाबत राहुल गांधींशी चर्चा झाली असं ट्विट केलं आहे.

या भेटीत महाराष्ट्रातील ४० जागांचा प्रश्न निकाली निघाला आहे. तर आठ जगाबाबत कोणी कोणती जागा लढवायची यावर चर्चा झाली असल्याचे समजते आहे.Loading…


Loading…

Loading...