युवकांनी स्वखर्चाने रंगविले धोकादायक खड्डे.

pothholes tree plantation in aurangabad

टीम महाराष्ट्र देशा – कोळकी गावच्या हद्दीतील वळणावर फलटण-शिंगणापूर रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वारंवार अपघात घडत होते. धोकादायक खड्डे बांधकाम विभाग कार्यालय फलटण यांच्याकडून आजअखेर बुजवले गेले नाहीत. धोकादायक खड्यामुळे सतत अपघात घडत होते. ही घटना काही युवकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी शासकीय विभागावर अवलंबून न राहता विजय कांबळे, मंगेश नाळे, महेश नाळे, भानुदास पवार, धनंजय डोईफोडे, धर्मराज शिंदे या युवकांनी धोकादायक खड्डे स्वखर्चाने रंगवायची मोहिम सुरू केली. युवकांनी स्वखर्चाने ज्या खड्यामुळे सतत अपघात होत आहेत

अशा खड्यांना पांढ-या रंगाने गतिरोधक संकेतानुसार रंगविले यामुळे अपघाताचे प्रमाण कमी झाले. या युवकांनी केलेले कामास रस्त्याने वाहतूक करणा-या अनेक नागरिकांनी दादही दिली.सार्वजनिक बांधकाम विभाग फलटण कार्यालय पावसाळ्यांनंतर पडलेल्या धोकादायक खड्डे बुजवण्याच्या कामाकडे दुर्लक्ष करत आहे असा आरोप नागरिकांमधून होत आहे. फलटण तालुक्यातील अनेक रस्त्याची अवस्था फार वाईट आहे खड्डे चुकवण्याच्या नादात अपघात घडत आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे महाराष्ट्रातील साधारण 96000 किमीपर्यतचे रस्ते 15 डिसेंबर पर्यत खड्डेमुक्त करण्यात येणार आहेत अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. त्यात कितपत यश मिळेल हे येणा-या काळात समजेलच